खळाळत्या जीवनाचा निर्झर म्हणजे भुसावळ;
मनातल्या माणूसकीचा पाझर म्हणजे भुसावळ......
सातपुड्याचा थंडगार वारा म्हणजे भुसावळ;
तापीच्या खळाळत्या धारा म्हणजे भुसावळ......
शिवाजीनगरातली कुस्ती म्हणजे भुसावळ;
भरीत खाऊन आलेली सुस्ती म्हणजे भुसावळ...
ढाब्या वरच्या शेवभाजीचा सुगंध म्हणजे भुसावळ;
विठ्ठल मंदिर वार्डातले बेधुंद म्हणजे भुसावळ...
विश्रामची फक्कड मिस्सळ म्हणजे भुसावळ;
बिबड्यांचा चटणी घालून घाटा म्हणजे भुसावळ...
भावड्या, चुव्वा, माऱ्या अशी हाक म्हणजे भुसावळ;
टमरेल, बेंगन्या अनं उज्याशी राडा म्हणजे भुसावळ...
शिव्यांमधलं रांगडे प्रेम म्हणजे भुसावळ;
राजकारणातला हेंगडे गेम म्हणजे भुसावळ...
मिरचीच्या ठेच्याचा बाज म्हणजे भुसावळ;
कळण्याच्या भाकरीचा साज म्हणजे भुसावळ...
आम्हा पोरांसारखे चुणचुणीत हे भुसावळ;
तिथल्या पोरींसारखे झणझणीत ते भुसावळ...
रात्रीच्या शेकोटीची उब म्हणजे भुसावळ;
कुळकर्णी प्लॉट मधली 'खुब' म्हणजे भुसावळ....
जिथ जावं; नावं घ्यावं......
अस ते भुसावळ;
म्हणा "माझे गांव" अभिमानाने ते भुसावळ
No comments:
Post a Comment